दहिगावातील शौचालयाची वाताहत : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष


यावल- तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालय हे गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छ न झाल्यामुळे परीरसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतीचे उदासीन धोरण
विरावली रस्त्यालगत असलेल्या सुरेश आबा नगरजवळील महिलांचे सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतीने बांधलेले आहे. या शौचालयात सांडपाण्याची सुविधा नाही, शौचालयात साफसफाई होत नाही, शौचालयाच्या परीसरात प्रचंड प्रमाणात झुडुपे वाढलेली आहेत. याच ठिकाणी मोठ-मोठे साप महिलांच्या निदर्शनास येतात. या भीतीमुळे माहिला शौचालयात न जाता उघड्यावर जातात. याचबरोबर परीसरात पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे शौचालयाअभावी अखेर त्यांनाही उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाची स्वच्छता मोहिम असलीतरी स्थानिक ग्रामपंचायतीला मात्र त्याचा विसर पडला आहे. अनेकवेळा गावकर्‍यांनी प्रशासनाला तोंडी व ग्रामसभेत ही हा प्रश्न विचारले असताना तात्पुरती ग्रामस्थांची मनोधारणा प्रशासनाने केलेली आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून ही बाब गंभीर असून रीरष्ठांनी लक्ष द्यावे अन्यथा सुरेश आबा नगरातील महिला यावल किंवा जळगाव जिल्हा परीषदेवर धडकणार असल्याचा इशारा महिला वर्गाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालय नसल्याने वर्ग प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे. गावात शौचालय शासनामार्फत बांधण्यात आले आहेत मात्र या शौचालयांचा किती कुटुंब उपयोग घेत आहेत. याचीही चौकशी करण्याची गरज आहे.


कॉपी करू नका.