प्रेमप्रकरणातून घर जाळले : एकास अटक


यावल : प्रेम प्रकरणात झालेल्या वादानंतर पोलिस कर्मचारी असलेल्या तरूणी व तिच्या कुटुंबीयांनी थेट संबधीत मुलाचे घर जाळल्याची घटना 18 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिस कर्मचारी असलेल्या तरुणीसह सात जणांविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरूवातीला दोघांना अटक करण्यात आली होती तर रविवारी पुन्हा एका संशयीतास अटक अटक करण्यात आली. फिरोज जुम्मा तडवी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

चौघांचा पालिसांकडून शोध
चुंचाळे, ता.यावल येथे जनाबाई हरी पाटील यांचा नातु शरद अशोक पाटील (रामेश्वर कॉलनी, रा.जळगाव) याचे गावातील राहिवासी तथा रत्नागिरी येथे पोलिस दलात असलेली तरुणीसोबत प्रेमसंबध होते. यातून वाद होत 18 जानेवारी रोजी जनाबाई यांच्या चुलत नात वैशाली हिच्या लग्नात जुम्मा हसन तडवीसह फिरोज जुम्मा तडवी, अफरोज जुम्मा तडवी, मुमताज जुम्मा तडवी, आरीफा संजु तडवी, संजु तडवी व ती तरूणी (सर्व रा.चुंचाळे यांनी) शरद यास मारहाण केली व नंतर जनाबाई यांचे घर जाळून टाकले होते. यात सुरवातीला जुम्मा हसन तडवी व अफरोज जुम्मा तडवी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती तर रविवारी फिरोज जुम्मा तडवी हा शेतातुन लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, पोलिस कर्मचारी राजेश वाढे यांनी त्यास शिताफीने अटक केली. अफरोज जुम्मा तडवी, मुमताज जुम्मा तडवी, आरीफा संजु तडवी, संजु तडवी व ती तरूणी (सर्व रा.चुंचाळे) यांचा शोध पोलिस घेत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !