वरणगावच्या शिवसैनिकाचे दातृत्व ; स्विकारले सहा गरीब विद्यार्थ्याचे पालकत्व


मुक्ताईनगर : शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कट्टर शिवसैनिक निलेश ठाकूर यांनी सिद्धेश्वर नगरातील जि. प. मराठी मुलांची शाळेतील पहिलीतील सहा मुलांच्या पाचवीपर्यंत शिक्षणासाठी लागणार्‍या खर्चाची जवाबदारी स्वीकारली. याबाबत संबधीत शाळेत जावून त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली .

यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य अ‍ॅड.मनोहर खैरनार, भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, किशोर कोळी, शिवा भोई, निलेश ठाकूर व मित्र परीवार व शिक्षक मंडळी उपस्थित होती.

शिक्षकांनी मांडली कैफियत
दरम्यान जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकांनी जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील व जिल्हा नियोजन समिती सदस्य अ‍ॅड.मनोहर खैरनार यांच्या समोर जिल्हा परीषद विभाग व वरणगाव नगरपालिकेच्या टोलवा-टोळवीने शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम रखडल्याची तक्रार केली शिवाय पालिकेकडून शाळा आमच्या ताब्यात नसल्याची तर जिल्हा परीषद पालिका हद्दीत शाळा असल्याचा दावा करीत असल्याचे सांगितले.


कॉपी करू नका.