जळगाव मनपातून अखेर सुरेश जैन यांचा फोटो हटवला


जळगाव : सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने मंगळवारी माजी मंत्री सुरेश जैन यांचा सभागृहातील फोटो हटवल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली. पालिकेपाठोपाठ महापालिकेतही गेलल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार सुरेश जैन यांनी जळगाव शहर व परीसराचे प्रतिनिधीत्व विधानसभेत केले. जळगाव घरकुल घोटाळ्याच्या निकालानंतर जैन हे दोषी ठरल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळेंसह प्रमुख अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यात सतरा मजलीतील दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सुरेश जैन यांचा फोटो काढून टाकण्याची मागणी करण्यात आली.


कॉपी करू नका.