भुसावळात पावसाने घर कोसळले


जीर्ण इमारतींचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

भुसावळ- शहरातील गंगाराम प्लॉट, कोलते चेंबरसमोरील निरज तिवारी नामक रहिवाशाचे घर संततधार पावसामुळे मंगळवारी सायंकाळी कोसळले. या घटनेत सुदैवाने जीवीतहानी टळली असलीतरी शहरातील पडावू व जीर्ण इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने तातडीने अशा घरांचा सर्वे करून या वास्तू पाडण्यासंदर्भात नोटीसा बजवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.