प्रवाशाचे पाकिट लांबवणारा भुसावळातील भामटा पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : बसमध्ये चढणार्‍या प्रवाशाच्या खिशातील पाकिट लांबवणार्‍या भामट्याच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हसन अली नियाज अली उर्फ हसु (रा.पापानगर इराणी मोहल्ला, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

प्रवाशाचे लांबवले पाकिट
शुक्रवार, 19 रोजी सकाळी साडेआठ वाजता तक्रारदार गोविंद कालुराम कहर (38, रा.मु.ढकोची पोस्ट, खालवा, ता.हरसोद,जि.खंडवा, मध्य प्रदेश) औरंगाबाद बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातून चोरट्याने 21 हजार 300 रुपये रोकड असलेले पाकिट लांबवले. खिशात पाकिट नसल्याचे लक्षातआल्यानंतर त्यांनी प्रवाशांना विचारणा केली असता संशयीत हसन अलीचे नाव पुढे आल्याने त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. आरोपी जाम मोहल्ला भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून नऊ हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली. पुढील तपास हवालदार संजय भदाणे करीत आहेत.


कॉपी करू नका.