भुसावळात उद्या वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा

वंचितचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ सभा : सभेची तयारी पूर्णत्वाकडे

0

Prakash Ambedkar, National President of Vanchit Aghadi, will hold a public meeting in Bhusawal tomorrow भुसावळ : रावेर लोकसभेच्या आखाड्यात उच्चशिक्षीत उमेदवार व अभियंता संजय पंडित ब्राह्मणे यांना वंचित बहुजन आघाडीने उमदेवारी जाहीर केली आहे. संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे बुधवार, 3 मे रोजी भुसावळ दौर्‍यावर येत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी 11 वाजता भुसावळ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (पूर्वीचे डी.एस.ग्राउंड) जाहीर सभा होत आहे. सभेच्या दृष्टीने अचूक नियोजन करण्यात येत आहे. सभा मंडपाची आयोजकांकडून पाहणी करण्यात आली.

पहिलीच राजकीय सभा
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भुसावळ शहरात पहिलीच राजकीय जाहीर सभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांची होत आहे. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने भुसावळ शहरात सभा घेतलेली नाही मात्र वंचितकडून प्रथमच शहरात जाहीर सभा होत आहे. जहिीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

 


कॉपी करू नका.