फडणवीसांचा नवा गौप्यस्फोट : म्हणाले शिंदेच्या बंडानंंतर आपल्या ठाकरेंनी दिली मुख्यमंत्री होण्याची ऑफर

0

मुंबई : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती, असे ते म्हणाले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मी संपूर्ण पक्षच घेऊन येतो असे ठाकरे म्हणाले
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असे म्हणत मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली मात्र वेळ निघून गेली होती. आम्ही एकनाथ शिंदेसोबत एकत्र येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले. त्यादिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेता किंवा त्यांना एखादे पद देता? मी संपूर्ण पक्षच घेऊन येतो. तुम्ही मुख्यमंत्री बना आपण हे सगळे नीट करू”, फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटामुळे आता राजकीय वातावरण तापण्याचे चित्र आहे.


कॉपी करू नका.