अनोळखी वृद्धाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू


शिरपूर : अरुणावती पुलाच्या वळणावर ब्रेक न लागल्याने भरधाव ट्रकने धडक दिल्याने अनोळखी वृद्धाचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी दोन वाजता हा अपघात झाला. ट्रक (क्रमांक एम.एच.18 ए.ए.8157) ही शिरपूरकडून खर्डेकडे भरधाव वेगाने जात असताना शहरातील खंडेराव बाबा मंदिर जवळील अरुणावती नदी पुलाच्या सुरुवातीस अनोळखी वृद्धाला धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक संदीप मुरकुटे,पोलीस कॉन्स्टेबल उमेश पाटील, स्वप्निल बांगर, अमित रणमाळे, बापूजी पाटील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत वृद्धाची ओळख पटली नसून मृतदेह कुटीर रुग्णालयात हलवण्यात आला.


कॉपी करू नका.