दोंडाईचात दोन गट भिडले : हाणामारीत एकाचा मृत्यू : पोलिसांच्या फायरींगमध्ये दोघे जखमी


दोंडाईचा : छेडछाड प्रकरणाचा आरोप झाल्याने दोंडाईचा पोलिस ठाण्यात दोन जमल्यानंतर संशयीत आरोपी समर्थकांनी संतप्त होत पोलिस ठाण्यावरच दगडफेक करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री शहरात घडल्यानंतर खळबळ उडाली आहे. हिंसक जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या दोन गोळीबारात दोन जण जखमी झाले असून एकाच्या पायाला तर दुसर्‍याच्या हाताला दुखापत झाली आहे. जमावाच्या पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान, यानंतरही दोन गटा एका रुग्णालयात भिडल्यानंतर झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

छेडछाड प्रकरणानंतर एक गट संतप्त
शहरातील अल्पवयीन मुलीची छेड दोघा मुलांनी काढल्याने पीडीतेने आपल्या भावाला सांगितल्यानंतर त्याने मुलांना चोप दिला. दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणात रात्री उशीरा पोक्सो कायद्यान्वये दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम असतानाच संशयीत आरोपींचे समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात आल्यानंतर जमावाने पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व अन्य कर्मचारींवर दडपण आणुन हुज्जत घालण्यास सुरुवात केली. जमावाने पोलिस निरीक्षक वारे व कर्मचार्‍यांवरच हल्ला केला. त्यामुळे वारे यांनी त्यांच्या सरकारी पिस्तुलातुन गोळीबार केला. यात दोघे जण जखमी झाले. गाोळीबारामुळे जमाव पोलिस ठाणे परीसरातून पळाला. या हाणामारीत वारे यांच्यासह दोन पोलिस जखमी झाले. गोळीबारातील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे पुन्हा एक जमाव आल्यानंतर पुन्हा हाणामारी सुरु झाली. यामध्ये दोंडाईचा येथील एक तरुण गंभीर जखमी झाला व उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !