माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींनी काढला 820 रीक्षा चालकांचा मोफत विमा
रावेर- रावेरसह यावल येथील 820 रीक्षा चालकांचा माजी प्रभारी नगराध्यक्ष व विधानसभा निवडणुकीतील इच्छूक उमेदवार अनिल चौधरी यांच्यातर्फे मोफत एक लाखाचा वाहतूक जीवन विमा काढण्यात आला. विम्यासंदर्भात कागदपत्रांचे नुकतेच वाटपही करण्यात आल्याने रीक्षा चालकांनी चौधरी यांचे आभार मानत त्यांना देवदूताची उपमा दिली. याप्रसंगी भुसावळ कृउबा सभापती सचिन चौधरी, युवा नेते धीरज चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, नगरसेवक अशोक चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, राजू तडवी, अन्वर खाटीक, विक्रम महाजन, कपिल पैलवान, अख्तर पैलवान, आसीफ शेख, पिंटू तेली, वसीम मण्यार, राजू काठोके, सद्दाम मण्यावर, राजू शेख, अस्लम तडवी, पिंटू मंडवाले आदी उपस्थित होते.