भुसावळात धूम स्टाईल मोबाईल लांबवणारे भामटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात


भुसावळ- धूम स्टाईल येत पादचार्‍याच्या हातातील मोबाईल लांबवणार्‍या भुसावळातील दोघा भामट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी शहर हद्दीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. डिगंबर उर्फ सागर रेवाराम कहार (रेल्वे नॉर्थ कॉलनी, भुसावळ) व हर्षल सुनील जाधव (चांदमारी चाळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.