बूथ कमिटया निवडणुकीचा आत्मा -विवेक ठाकरे


निंभोरा- एमआयएम व वंचित आघाडी पूर्ण ताकदीने निवडणूक रींगणात उतरणार असून निवडणूक सोपी करण्याच्या उद्देशाने बूथ कमेट्या म्हणजे निवडणुकीचा आत्मा असल्याने बूथ समन्वयकांनी तळमळीने काम करावे, असे आवाहन जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
एमआयएम-वंचीत आघाडीच्या वतीने जिल्हा परीषद गटनिहाय बूथ कमिट्या तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बुधवारी
चिनावल-खिरोदा, विवरा-वाघोड आणि निंभोरा-तांदलवाडी गटाच्या बूथ समन्वयांची बैठक झाली. प्रसंगी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

रावेरची जागा एमआयएमला सुटावी
वंचित संघटनेचे नेते अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरीस्टर ओवेसी यांच्यात पुन्हा आघाडी होण्याच्या दृष्टीने बोलणे सुरू झाल्याने कार्यकर्त्यांना आनंद झाल्याचे दिसून आले. एमआयएम व वंचितची आघाडी झालीच पाहिजे, अशी भावना बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

यांची होती उपस्थिती
वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव महेश तायडे, रावेर तालुकाध्यक्ष मनोहर कोळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रकांत गाढे, यावल येथील धोबी समाजाचे संतोष वाघ, शकील खाटीक, विजय गाढे, राहुल गाढे, धनराज वाघोदे, सिद्धार्थ मोरे, सतीश गाढे, कुंदन गाढे, अमोल लहासे यांच्यासह एमआयएमचे नजीर शेख बशीर, उमर शेख फारुख, अलतमश शेख रईस, अनिस शेख कय्युम,नय्युम बेग अय्युब, अझहर रईस खान,साजिद शाह,शेख शकील, शोएब युनूस खान, अनिस शेख हमीद आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.