भुसावळ पाणीपुरवठा सभापती महेंद्रसिंग ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते डस्टबीनचे वाटप
भुसावळ- भुसावळचे नगरसेवक व पालिकेतील पाणीपुरवठा सभापती महेद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग 20 मधील दत्तमंदिर परीसरातील वॉल कम्पाऊंडचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. दीनदयाल नगरात लाडूतुला करण्यात आली तसेच महिलांसाठी डस्टबीनचे वाटप करण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी, किशोर पाटील, अॅड.बोधराज चौधरी, पुरूषोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, वसंत पाटील, दिनेश नेमाडे, वसंत पाटील, गिरीश महाजन, रवी ढगे, आकाश राजपूत, अरुण धनगर, प्रदीप सपकाळे, राहुल वरणकर, वॉर्डातील महिला भजनी मंडळ व मंदिरातील ट्रस्टी व नागरीक उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथअप्पा सोनवणे, विक्की निरखे, रवी पाटील, सिंगतकर, काशिनाथ पाटील, बोरणारे, किशोर पाटील, रुपेश पाटोळे, पिंटू भारंबे, संदीप पाटील तसेच महिला मंडळामधील हभप पांगळे, बडगुजर, हिवरकर आदींची उपस्थिती होती. प्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पिंटू ठाकूर यांचा सत्कार केला.