भुसावळात मुख्याधिकार्‍यांच्या घरावर दगड भिरकावून आरोपी पसार


भुसावळ- पालिकेच्या नूतन मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या शांती नगरातील घरावर अज्ञाताने दगड भिरकावल्याची घटना 17 रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेच्या मुख्याधिकारी डहाळे या शांती नगरात भाड्याने राहतात. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या घरात असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या खिडकीवर दगड भिरकावल्याने काच फुटला तर आरोपी लागलीच पसार झाला. या प्रकरणी त्यांनी बुधवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिल्यानंतर भादंवि 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.