छत्तीसगड : सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा


छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये आज, शनिवारी जिल्हा राखीव दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झडली. जवानांनी सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. अद्याप चकमक सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.  राजनंदगावमधील बगनादी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीतागोटा जंगल परिसरात नक्षलवादी आणि जिल्हा राखीव दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. जवानांनी सात नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. त्यांच्याकडील शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. अद्याप चकमक सुरू असल्याची माहिती छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली.  यापूर्वी, २९ जुलै रोजी सुकमा जिल्ह्यातील कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात जिल्हा राखीव दलानं कारवाई करून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यात एका महिलेचाही समावेश होता. घटनास्थळावरून शस्त्रेही जप्त करण्यात आली होती.


कॉपी करू नका.