एमआयएम पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी फिरोज शेख
भुसावळ- ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन अर्थात एमआयएम पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी भुसावळातील फिरोज शेख यांची निवड करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.बॅरिस्टर असोद्दीन ओवेसी यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या पूर्वपरवानगीने
उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ.खालीद परवेज यांनी फिरोज शेख यांना निवडीचे पत्र दिले. फिरोज शेख हे गेल्या आठवर्षांपासून एमआयएम पक्षाशी जुळून आहेत. त्यांनी गेल्यावेळी एमआयएम पक्षाकडून भुसावळ पालिकेची लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. फिरोज शेख यांनी रावेर लोकसभेच्या सातही विधानसभा क्षेत्रात पक्षाचे संघटन करणे व धोरणांचा विस्तार करणार असल्याचे नमूद केले आहे.