बंद घरातून 20 वातानुकूलित यंत्र जप्त


धुळे : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील लळिंग गावातील हनुमान धर्माजी गवळी (रा. लळिंग) यांच्या बंद घरातून पोलिीसांनी 10 इनडोअर आणि 10 आऊट डोअर अशी 20 वातानुकूलित यंत्रे जप्त केली असून ती जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. हनुमान धर्माजी गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. जप्त यंत्राची किंमत पाच लाख 4 हजार 100 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. आय. मिर्झा व पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !