भुसावळात विनाकारण फिरणार्‍यांमध्ये तीन बाधीत आढळले


भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि पोलिस प्रशासनाने शहरात संचारबंदीचे उल्लंघण करणार्‍यांवर धडक मोहीम सुरू केली आहे, दररोज विना मास्क लावणार्‍यांसह विनाकारण बाहेर फिरणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. सोमवारी सकाळी पोलिसांनी 70 जणांनी अचानक अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्यानंतर त्यात तीन तन बाधीत आढळल्याने त्यांना उपचारार्थ हलवण्यात आले.

रीक्षा चालक रडावर
सोमवारी गांधी पुतळा, जामनेर रोड भागातही पोलिसांकडून अचानक वाहनधारकांसह रीक्षा चालकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. मंगळवारपासून रीक्षा चालकांच्या अँन्टीजन टेस्ट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. सोमवारी शहर हद्दीत सकाळी 70 नागरीकांमधून तीन बाधीत गांधी पुतळ्याजवळ आढळल्याचे ते म्हणाले तर बाजारपेठ हद्दीतही कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. काहीही कारण नसताना फिरणार्‍या नागरीकांना प्रयेकी पाचशे रुपये प्रमाणे दंड केला जात आहे तसेच आहे तसेच गाडी चालवताना परवाना सोबत नसणे, गाडीचे कागदपत्रे नसणे, तीन शीट चालवणे आदी कारणांवरून दंड केला जात आहे. भुसावळकर नागरीकांनी संचारबंदीचे उल्लंघण करू नये अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !