यावलमध्ये अँन्टीमध्ये आढळले एकाच कुटुंबातील पाच जण बाधीत
यावल : तालुक्यात सर्वत्र कोरोनाचा फैलाव वाढत असताना या प्रशासनाकडून अॅन्टीजन मोहिम राबवली जात आहे. विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावल नगर परीषद व आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातुन शहरातील विविध व्यापारी संकुल, भाजीपाला फेरीवाले व्यापारी, फळ विक्रेते हॉटेल व्यवसायीक व विना मास्क फिरणार्या आदींची अॅन्टीजन तपासणी मोहिम अंतर्गत तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी शहरात 284 जणांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली. धक्कादायक प्रकार म्हणजे शहरात एकाच कुटुंबातील पाच जण पॉझीटीव्ह आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
284 पैकी 15 बाधीत आढळले
सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण 284 जणांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यावल शहरातील 15 पॉझीटीव्ह तर 2 पॉझीटीव्ह हे बाहेर गावाचे आले आहेत. यातील 267 जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती यावल नगर परीषदेच्या अॅन्टीजन तपासणी मोहीम पथकातील नगर परीषद कार्यालयीन अधीक विजय बढे यांनी दिली. यावेळी , आरोग्य निरीक्षक शिवानंद कानडे, रवीन्द्र काटकर, नितीन पारधे, राजेंद्र गायकवाड, रामदास घारू, लखन घारू, संदीप पारधे, विश्वनाथ गजरे आदी नगर परीषद कर्मचारी उपस्थित होते. यावल ग्रामीण रुग्णालयाचे तंत्रज्ञ नानासाहेब घोडके व त्यांचे आरोग्य कर्मचारी यांनी ही पोलिसांच्या वतीने अॅन्टीजन मोहिम राबवली. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या वतीने विनाकारण रिक्याम्या फिरणार्या एकूण 10जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.



