‘कोरोना’मुळे मनमिळावू शिक्षकाचा मृत्यू : कुटुंबियांना मदतीसाठी एकवटला मुक्ताईनगर तालुका


मुक्ताईनगर : तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा राजुरा येथे कार्यरत असणारे व मूळचे अमळनेर तालुक्यातील नवनीत नामदेव बडगुजर (51) यांचे 11 एप्रिलला ‘कोविड-19’ संसर्गाने उपचारादरम्यान निधन झाले. नम्र, प्रेमळ स्वभावाच्या व शाळेत विद्यादानाचे कार्य तळमळीने करणार्‍या बडगुजर सरांच्या अनपेक्षितपणे झालेल्या मृत्यूने सर्व तालुक्यातील शिक्षक हळहळले. त्यातल्या त्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचे काम केल्यानंतर दोनच दिवसांत बडगुजर यांची तब्बेत गंभीर होऊन मृत्यू झाल्यानंतर खंतही व्यक्त करण्यात आली. ‘कोरोना’ विषयक कार्य मनापासून करतांना आलेला मृत्यू व बडगुजर सरांच्या घरची नाजूक आर्थिक स्थिती यांचा विचार करून तालुक्यातील शिक्षकांनी या ‘कोविड योद्ध्याच्या’ कुटुंबियांना आपल्या परीने मदत करण्याचे ठरविले. प्रत्येक केंद्राची जबाबदारी एका शिक्षकाने सांभाळली. या 11 जणांची ‘सहायता निधी समिती’ स्थापन करण्यात आलीव तालुक्यातील शिक्षकांना आवाहन केल्यानंतर तीन दिवसांत 88 हजार 73 इतका निधी जमा झाल्यानंतर अमळनेर येथे कै.बडगुजर सरांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचविण्यात आला.

यांनी पार पडली जवाबदारी
याकामी शिक्षक धनलाल भोई, ज्ञानेश्वर चौधरी, उमेश खानझोडे, राजेंद्र रोटे, मंगेश ढेंगेर, संतोष धनगर, रोशन साळुंखे, मनोज पाटील, अतुल लोढे, गौतम ननीर यांनी आपापल्या केंद्रातून सहायता निधी संकलनाची जबाबदारी मनःपूर्वक पार पाडली. तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी चांगला प्रतिसाद दिला व तुटपुंजा पगार असणार्‍या शिक्षण सेवकांपासून ते सर्व तरुण, ज्येष्ठ शिक्षक, उर्दू शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी आपले योगदान दिले. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख विजय पवार, राज ुदादा तडवी, अनिलकुमार पाठक, संजय ठोसर, संतोष धनगर, प्रदीप कोसोदे, विजय चौधरी यांनी पण मदत केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !