भुसावळात 15 रक्तदात्यांनी केले रक्तदान


भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था, गोपाल युवा बिग्रेड रक्तदाते व डॉ.बी.आर.आंबेडकर फाऊंडेशन यांच्यावतीने सोमवार, 19 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात एकूण 15 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. स्थानिक नेत्रम आय हॉस्पिटल, ब्राम्हण संघाजवळ आयोजित या शिबिराचे उद्घाटन नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुवर्णा गाडेकर, डॉ.सुनील मेश्राम यांच्यासह राजश्री नेवे, निलेश फंड व राहुल पांडव उपस्थित होते.

15 दात्यांनी केले रक्तदान
स्थानिक नेत्रम आय हॉस्पिटल, ब्राम्हण संघाजवळ आयोजित शिबिरात 15 दात्यांनी रक्तदान केले. डॉ.सुवर्णा गाडेकर, डॉ.सुनील मेश्राम यांच्यासह राजश्री नेवे, निलेश फंड व राहुल पांडव उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी निलेश फंड, राहुल पांडव, अनुराधा टाक, दिलीपकुमार टाक, उमेश नेवे, सागर मुरलिया यांनी परीश्रम घेतले. नेत्रम हॉस्पिटल, भुसावळ ब्लड बँक यांचे रक्त संकलनासाठी मोलाचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांना सखी श्रावणी तर्फे वृक्ष रोप देण्यात आले तर गोपाल युवा बिग्रेड रक्तदाता संस्थेतर्फे विशेष प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !