धक्कादायक : भुसावळात रेमडेसीव्हरची 20 ते 25 हजारात विक्री : लॅबचालकासह दोघांना अटक


बाजारपेठ पोलिसांच्या कारवाईने खळबळ : चौकशीकामी अन्य दोघेही ताब्यात

भुसावळ : कोरोना रुग्णांसाठी लागणार्‍या रेमडेसीव्हर इंजेक्शनची तब्बल 20 ते 25 हजारात विक्री करणार्‍या दोघांंना पोलिसांनी अटक केली. लॅब चालक विशाल शरद झोपे (28, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (18, मानमोडी, ता.बोदवड) यांना अटक करण्यात आली. बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये ही कारवाई बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली.




यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, ईश्‍वर भालेराव, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली. कारवाईदरम्यान दोन पंचांना सोबत घेण्यात आले तर एफडी निरीक्षक अनिल माणिकराव यांनी इंजेक्शनची तपासणी करून ते अधिकृत असल्याचे सांगितले. बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस चौकशीत लॅब मालकाने आतापर्यंत 15 ते 25 हजार रुपये दराने भुसावळात आतापर्यंत 30 ते 35 हजारात रेमडेसीव्हरची विक्री केल्याची माहिती दिली असून त्यानुषंगाने पोलिसांनी दोन संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !