रावेर तालुक्यातील आदिवासी पट्यात गारांचा पाऊस : पंचनाम्यांचे आदेश


रावेर : आदिवासी पट्यात लालमाती सहस्त्रलिंग परीसरात बुधवारी गारांचा पाऊस झाला. सुमारे पंधरा मिनिट गारांचा पाऊस झाल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. यामुळे कुठलेही नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. गारांच्या पावसा वातावरणात अचानक बदल झाला आहे. रावेर तालुक्यात आदिवासी पट्यात बुधववारी दुपारी लालमाती, जूनोने, गारबर्डी, अभोडा, मंगरूळ, पिंप्री भागात गारपीटसह वादळी पाऊस झाला आहे. काही गटात केळीचे नुकसान झाले आहे. मोहगण बु.॥ येथे देखील नुकसान झाले आहे तर मंगरूळ्रमध्ये झालेले नुकसान महसूल विभागातर्फे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !