बंद द्वारातूून भाविकांनी घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन


सलग दुसर्‍या वर्षी कोरोनाचा फटका : कोरोना नियमांचे पालन करून मंदिरात अभिषेक व आरती

भुसावळ : मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामचंद्र जन्मोत्सवाला सलग दुसर्‍या वर्षी कोरोनामुळे काहीशा अडचणी आल्या असल्यातरी भक्तीभाव कायम ठेवत भाविकांनी मनोभावे मंदिराबाहेरूनच दर्शन घेत कोरोनामुक्तीसाठी भुसावळ शहर विगागात साकडे घातले. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत मात्र जन्मोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्स राखत बुधवारी अभिषेक व आरती करण्यात आली.

बोदवड : शहरात श्रीराम मंदीर येथे श्रीराम नवमी उत्सव साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांनी डिस्टन्स राखून मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले. कोविडच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून भगवंताचा अभिषेक व महा आरती करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. उत्सवासाठी श्रीराम मंदीर भक्त वृंद व गावकरी यांनी परीश्रम घेतले.




सलग दुसर्‍यांदा कोरोनाची अडचण
गतवर्षीदेखील कोरोनामुळे जयंती उत्सवाला मर्यादा आल्या होत्या तर यंदादेखील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मंदिरे बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनी मंदिराबाहेरूनच मनोभावे दर्शन घेतले. मंदिरात पुजारी व दोन, तीन भाविकांच्या उपस्थितीत तोंडाला मास्क लावून जन्मोत्सव साजरा झाला. अखिल विश्वाचे महामारी कोरोनाचे संकट दुर व्हावे, अशी प्रार्थना भाविकांनी यावेळी केली. शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या चौकांच्या श्रीराम मंदिरातही यंदा जन्मोत्सव पारंपारिक पंध्दतीने न होता, कोरोना नियमांचे पालन करून झाला. पुजारी व केवळ दोन तीन भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सवानिमित्त पुजा, अभिषेक, महाआरती करण्यात आली.

यंदा सार्वजनिक कार्यक्रम रद्द
यंदा सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. पुजारी व दोन , तीन भाविकांनीही कोरोना नियमांचे पालन करीत तोंडावर मास्क, फिजीकल डिस्टंन्सींग पाळून धार्मिक विधी पार पाडला. मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांनी प्रवेशव्दारालाच हार- फुले हळदीकुंकू वाहून पुजा करीत दर्शन घेतले. मंदिराच्या परिसरात दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी पोलिस कर्मचारीही तैनात होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !