आईचा वाढदिवस केला संस्मरणीय : ट्रामा केअर सेंटरला दिले प्युरीफायर
भुसावळ : आयुष्यातील वाढदिवस संस्मरणीय ठरावा… खरे तर ही सार्यांची इच्छा… मात्र त्यात अपवादानेच काहींना यश येते. ज्ञानदानाचे धडे देतानाच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका असलेल्या आपल्या आईचा वाढदिवस संस्मरणीय लागण्यासाठी सुसंस्कारी शिक्षक पुत्राने भुसावळातील ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी बुधवारी वॉटर प्युरीफायर सप्रेम भेट वाढदिवसाचा गोडवा आणखीन वाढवला. या प्युरीफायरमुळे रुग्णांची तहान भागण्यासही मोठी मदत झाली असून उन्हाळ्यात थंड पाण्याचा गारवा तर हिवाळ्यात गरम पाण्याचीदेखील सोय झाली आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शिक्षिका पूत्राने रुग्ण सेवा हेच मानले कर्म
भुसावळच्या श्री.र.न.मेहता हि.ंदी प्राथमिक विद्यामंदिरातील उपक्रमशिक्षक उपशिक्षक अमित विजय चौधरी यांनी आपल्या आई तथा सेवानिवृत्त शिक्षिका वत्सला चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी गरम-थंड पाण्याचे वॉटर प्युरीफायर भेट दिले. या अनोख्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.



