साकेगावजवळ जबरी दरोडा : आरोपी आदर्श तायडे जाळ्यात


जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : दुचाकी जप्त : मध्य प्रदेशातील आवळल्या मूसक्या : दोन संशयीत अद्याप पसार

भुसावळ : दुचाकीने शेताकडे निघालेल्या साकेगाव व्यापारी तथा शेतकरी विनोद बजरंग परदेशी (रा.साकेगाव) यांना लुटण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजता साकेगाव महामार्गाजवळ घडली होती. सिनेस्टाईल आलेल्या आरोपींनी परदेशी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 75 हजारांची रोकड व सुमारे पाच तोळे वजनाच्या दोन चैन मिळून सुमारे तीन ते तीन सव्वा लाखांचा ऐवज लांबवला होता. तक्रारदार विनोद परदेशी यांनी लुटारूंपैकी एक संशयीत सोनू पांडे यास ओळखले असलेतरी गुन्ह्यानंतरही तीनही संशयीत पसार झाले होते. त्यातील एक संशयीत मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील बोरसोल, जि.बर्‍हाणपूर येथून बुधवारी अटक करण्यात आली. आदर्श उर्फ डफली बाळु तायडे (वय 23, रा. न्यू आंबेडकर नगर भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून दुचाकी जप्त करण्यात आली.

लुटीत पिस्टलचा वापर झाल्याची होती चर्चा
तक्रारदार विनोद बजरंग परदेशी (51, रा.साकेगाव) हे किराणा व्यावसायीक तसेच शेतकरीदेखील आहेत. सोमवार, 19 एप्रिल सकाळी 10 वाजता ते दुचाकीने साकेगाव शिवारातील महामार्गालगतच्या शेतात भाजीपाला आणण्यासाठी निघाले असता सिनेस्टाईल दुचाकीने आलेल्या तिघा लुटारूंनी परदेशी यांची दुचाकीला लाथ मारून दुचाकी खाली पाडली होती. साकेगाव वेथील फार्मसी कॉलेजच्या मागेही घटना घडली होती. आरोपींनी परदेशी यांच्या मानेवर काहीतरी धारदार वस्तू लावून त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाच्या दोन चैन तसेच खिशातील 75 हजारांची रोकड लांबवली तर तत्पूर्वी त्यांना मारहाण करीत काही कळण्याआत पोबारा केला होता. लूटीत आरोपींना पिस्टलचा वापर केल्याचा अंदाज असलातरी ते स्पष्ट अद्याप झालेले नाही. लुटारूंनी परदेशी यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चेन, मोबाईल व दहा रुपये रोख असा 2 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे.




गोपनीय माहितीवरून अटक
जळगाव गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बको यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रा.का.पाटील, अशोक महाजन, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, सुरज पाटील, राजेंद्र पवार, दीपक चौधरी यांच्या पथकाने गोपनीय माहितीवरून मध्यप्रदेशातील संशयीत आरोापी डफलीच्या मूळ गावी बोरसोल येथून त्याच्या मुसक्या आवळल्या शिवाय आरोपीच्या घरातून दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपला भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !