न्हावी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर होणार सुरू


फैजपूर : न्हावी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नव्याने सुरू होत असलेल्या 50 बेडच्या ऑक्सिजन कोविड सेंटर ची पाहणी जिल्हा चिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी केली. यावेळी उपस्थित असलेले आमदार शिरीष चौधरी यांनी नव्याने सुरू होत असलेल्या 50 बेडच्या कोविड सेंटरसाठी त्वरीत ऑक्सिजन यंत्रणा उपलब्ध व्हावीख, अशी मागणी केली. त्याला प्रतिसाद देत ऑक्सिजन यंत्रणेची व्यवस्था लवकरच होईल, असे डॉ.चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हा चिकित्सकांची भेट
गुरुवारी डॉ.एन.एस.चव्हाण यांनी कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर न्हावी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली व तेथील डॉक्टरांशी सोयी-सुविधेबाबत चौकशी केली. यावेळी त्यांनी न्हावी येथील रुग्णालयाच्या रुग्णांना मिळणार्‍या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले तसेच जे.टी.महाजन महाविद्यालयाच्या जुन्या वस्तीगृहात सुरू होणार्‍या 50 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरची पाहणी केली.




यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी निलेश पाटील, मंडळाधिकारी जे.डी.बंगाळे, तलाठी प्रशांत जावळे, डॉ.शैलेंद्र खाचणे व संजू राजपूत यांची उपस्थिती होती. यावेळी चव्हाण यांनी माहिती देतांना सांगितले की, रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा पुढील आठवड्यापासून सुरळीत होईल. रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टराच्या सुचनेनुसारच औषधोपचार करावे, असे आवाहन त्यांनी केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !