भुसावळात आजपासून ग्राहकांच्या सोयीसाठी पाच ठिकाणी बाजार
भुसावळ : कोरोनामुळे आठवडे बाजार भरणार नसलातरी शहरातील पाच ठिकाणी वेगवेगळ्या जागेवर भाजी बाजार शुक्रवारपासून सकाळी 7 ते 11 या वेळेत भरेल. पालिकेच्या अभियंत्यांनी गुरुवारी पाचही जागांवर आखणी केली. टीव्ही टॉवर मैदान, विकास कॉलनी परीसर, गडकरी नगर, भुसावळ हायस्कूल परीसर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान या पाचही ठिकाणी भाजी बाजार भरवला जाणार आहे. नागरीकांनी दिलेल्या वेळेत भाजीपाला आपल्या जवळच्या बाजारातून खरेदी करावा, असे आवाहन पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले. कोरोनाचे नियम मोडणार्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई होईल तसेच दुकानदारांनी आणि ग्राहकांनी तोंडाला मास्क लावावा.




