मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात लवकरच नॅचरल ऑक्सिजन प्लांट
पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकार्यांची अनुकूलता : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व ऑक्सिजनची कमतरता पाहता आमदार चंद्रकांत पाटील यांनी लोकवर्गणीची संकल्पना राबवत येथे ड्युरा सिलेंडर उपलब्ध करुन दिल्याने रुग्णांवर उपचार करणे सोयीचे झाले आहे. जिल्हा धर्तीवर एक यशस्वी रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ठरत आहे. दरम्यान, सिलिंडर वेळेवर भरून आणण्याची अडचण पाहता नॅचरल ऑक्सिजन प्लांट उभारावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. या मागणीला पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी हिरवा कंदील दिला आहे.
पत्र रुग्णाला प्राप्त
आमदारांच्या मागणीनंतर याबाबत मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय, टंचाई शाखा यांचे मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाला पत्र प्राप्त झाले आहे. आता लवकरच येथे नॅचरल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे खूप मोठ्या अडचणी दूर होईल तसेच रुग्णांना मुबलक असे ऑक्सिजन मिळणार आहे. या प्लांट मध्ये 250 ते 300 नॅचरल ऑक्सिजन सिलेंडर तयार होतील जेणेकरून 3 हजार ते 3.5 हजार क्षमतेचे ऑक्सिजन सिलिंडर नैसर्गिक वातावरणातून निर्मिती केली जाईल. प्लांटमधून मुक्ताईनगर, बोदवड, सावदा, रावेर आदी तालुक्यात देखील मुबलक ऑक्सिजन पुरवठा होणार आहे.



