अरे देवा ! : 21 रुग्ण दगावले तर 1048 कोरोना बाधीत पुन्हा आढळले
आतापर्यंत कोरोनामुळे 2037 रुग्णांचा मृत्यू : 24 तासात 1030 रुग्णांची मात
जळगाव : जिल्ह्यात 24 तासात नव्याने 1048 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 21 रुणांचा मूत्यू झाला तर कोरोनामुळे आजअखेर 2037 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 14 हजार 752 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख एक हजार 788 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 1030 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 204
जळगाव ग्रामीण 28
भुसावळ 90
अमळनेर 84
चोपडा 84
पाचोरा 53
भडगाव 28
धरणगाव 34
यावल 37
एरंडोल 20
जामनेर 105
रावेर 97
पारोळा 46
चाळीसगाव 50
मुक्ताईनगर 31
बोदवड 26
अन्य जिल्हा 31



