साकेगाव प्रभारी सरपंचपदी आनंद ठाकरे


भुसावळ  : तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता कोळी या प्रसुती रजेवर गेल्याने रीक्त पदाचा पदभार उपसरपंच आनंद ठाकरे यांनी तिसर्‍यांदा स्वीकारला. 23 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत प्रभारी सरपंच पदाचा कार्यभार ठारके यांनी स्वीकारला. साकेगाव ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्मार्ट विलेज निर्मितीचा मानस असून त्यासाठी कसोसीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !