भुसावळातील मारहाणीच्या गुन्ह्यात पसार आरोपीला वर्षभरानंतर अटक
भुसावळ : कारसमोर दुचाकी लावल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना शहरातील खडका रोडवरील सिद्धेश्वर मंदिरासमोर 16 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती. या प्रकरणी जनआधार पार्टीचे उपगटनेता शेख जाकीर शेख सरदार यांच्यासह चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील पसार आरोपी शेख नाजीश शेख नासीर (19, सिद्धेश्वर मंदिराशेजारी, खडका रोड, भुसावळ) यास 23 रोजी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.




