भुसावळात लॉकडाऊन उल्लंघणाच्या शुक्रवारी पोलिसांकडून 108 केसेस


अचानक तपासणीत पाच बाधीत आढळले : 218 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि पोलिस प्रशासनाने शहरात संचारबंदीचे उल्लंघण करणार्‍यांवर कारवाई सत्र सुरू ठेवले आहे. विना मास्क वावरणार्‍यांसह लॉकडाऊनचे उल्लंघण करणार्‍या 108 केसेस शुक्र्रवारी पोलिसांनी करीत दंड वसुल केला तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघण करणार्‍या 218 वाहनधारकांकडून दंड वसुल करण्यात आला. दरम्यान, कोरोना स्प्रेड थांबवण्यासाठी बाहेर फिरणार्‍यांची नगरपालिका व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने सकाळच्या वेळी अ‍ॅन्टीजन केली जात असून भुसावळ शहर व ग्रामीण भागात 281 नागरीकांची अ‍ॅन्टीजन केल्यानंतर त्यात पाच बाधीत आढळल्याने त्यांना उपचारार्थ हलवण्यात आले. भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !