सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांना कोरोनाची लागण
सावदा : सावदा पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजेश गजानन वानखेडे यांची कोरोना चाचणी नुकतीच पॉझीटीव्ह आली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. वानखेडे यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याचे समजताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांना विचारपूस केली व त्यांना मुक्ताईनगर येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल होण्याबाबत सांगितले. राजेश वानखेडे यांनी देखील यावेळी खाजगी रुग्णालयात दाखल न होता सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेत घेतला. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजच्या कठीण काळातदेखील त्यांनी राजकीय मदभेद बाजूला सारून सर्वांनी एकत्रीत येऊन शहरवासीयांची मदत करण्याचे आवाहन केले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची विचारपूस केली. डॉ.राणे हे त्यांचेवर उपचार करीत आहे.
संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे आवाहन
नगरसेवक राजेश वानखेडे यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या कठीण काळात नागरीकांनी घरात बसून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच विनाबाहेर बाहेर फिरू नये, असे आवाहनही केले आहे.


