भुसावळचे निलेश राणे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी
भुसावळ- जोधपुर (राजस्थान) येथे 15 सप्टेंबर 2019 रोजी स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अॅण्ड प्रोमोशन फेडरेशन, भारत (एसडीपीएफ) च्या पहिल्या राष्ट्रीय वार्षिक बैठकीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेविषयी व खेळाडूंच्या विषयावर चर्चासत्र झालेण त्यानंतर देशातील काही राज्यांच्या राज्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यात भुसावळचे युवा क्रीडा मार्गदर्शक निलेश राणे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. .राणे यांना फेडरेशनचे अध्यक्ष अभिजीत सिंग व राष्ट्रीय सचिव सतीश राणा व राज्यांचे सर्व सचिव यांच्या उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.