यावलच्या चार वर्षीय चिमुकल्याने केले रमजानचे रोजे
यावल : शहरातील सुदर्शन चित्र मंदिर चौक, डांगपुरा या परीसरात राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांचा चार वर्षीय चिमकुला मुलगा मुसखर शेख याने पवित्र रमजान महिन्यातील रोजा (उपवास) ठेवले. मुसखर शेख याने दाखवलेल्या या धाडसाचे समाज बांधवांमध्ये सर्वत्र कौत्तुक होत आहे. त्यास आजी, आई, वडील, काका व पत्रकार काबीज शेख यांनी आशीर्वाद दिले आहे.




