कोरोना : 20 रुग्णांचा मृत्यू तर 24 तासात 1070 बाधीत आढळले


एकाच दिवसात 1097 रुग्णांची मात : मृतांची संख्या पोहोचली 2078 वर

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून रविवारीदेखील 20 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून एक हजार 70 बाधीत आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 16 हजार 868 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख तीन हजार 891 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत दोन हजार 78 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी एक हजार 97 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू ओढवल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात आज बाधीत रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या 27 ने जास्त असून मृत्यूतही एकने घट झाली आहे.

रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 191
जळगाव ग्रामीण 57
भुसावळ 120
अमळनेर 171
चोपडा 55
पाचोरा 33
भडगाव 21
धरणगाव 44
यावल 42
एरंडोल 41
जामनेर 77
रावेर 45
पारोळा 37
चाळीसगाव 47
मुक्ताईनगर 54
बोदवड 31
अन्य जिल्हा 04






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !