विनापरवाना मद्याची वाहतूक : तिघांविरुद्ध गुन्हा
वरणगाव : शहरातील जय बजरंग ढाब्यासमोर मारोती कारमधे विना परवाना दारूची वाहतूक केल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी कारवाई करीत चारचाकीसह मद्य मिळून एक लाख दहा हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दिनेश मनोहर माळी (22, महात्मा गांधी नगर, वरणगाव), रवींद्र गायकवाड (35), संतोष नारायण जैस्वाल (35, मकरंद नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत सिल्व्हर रंगाच्या विना क्रमांकाच्या मारूती कारमधून शुक्रवारी रात्री आठ वाजता जय बजरंग ढाब्या समोर विनापास परवाना गैर कायदा दारू विक्री करताना आढळल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कमलाकर देविदास राजहंस यांच्या खबरीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.




