भुसावळात धूम स्टाईल महिलेची पर्स लांबवली


भुसावळ : धूम स्टाईल चैन लांबवण्याच्या घटनांप्रमाणे चोरट्यांनी आता थेट महिलेच्या हातातील पर्स लांबवल्याची घटना शांतीनगर भागातील सोपान चौकात रविवारी सायंकाळी सात वाजता घडल्याने महिलावर्गात भीती पसरली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शांती नगर भागातील पाटील प्लाझा येथील रहिवासी मीनाक्षी सुधिर चौधरी या रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास रस्त्याने जात असताना सोपान चौकात मोटरसायकलवर आलेल्या दोन 20 ते 25 वयोगटातील भामट्यांनी महिलेच्या हातातील पर्सला हिसका मारत पर्स लांबवली. या पर्समध्ये साडेचार हजार रुपये रोख, 16 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पँडल, व दोन हजार रुपये किंमतीचा जुना मोबाईल असा ऐवज होता. याप्रकरणी शहर पोलिसात मीनाक्षी चौधरी यांनी फिर्याद दिल्यानंतर हवालदार मोहमद वली सैय्यद यांनी भादंवि 392 व 34 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !