निंभोरा सेंट्रल बँकेत लिंक बंदने ग्राहकांना मनस्ताप


निंभोरा- सेंट्रल बँकेत आधीच कमी कर्मचार्‍यांवर काम चालवत असतांना गेल्या तीन महिन्यात अनेकदा लिंक बंद असल्यामुळे बँक ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. किमान 70 ते 80 कोटींवर व्यवहार असलेल्या या जिल्ह्यातील भक्कम आर्थिक व्यवहार असलेल्या बँकेत बीएसएनएलच्या लिंकवर अवलंबून रहावे लागत आहे. बीएसएनएलची वारंवार नेट कनेक्टिव्हिटी बंद पडणे ग्राहकांना मनस्ताप देणारी ठरत आहे.गेल्या तीन महिन्यात असे प्रकार वाढत असल्याने या बँकेत नेट व वीज व्यवस्था बदलण्याची गरज आहे. अशीच परीस्थिती 16 रोजी दुपारी रोकड नसल्याने थांबलेल्या ग्राहकांना अनुभवायला मिळाली. गावात वीज वितरणतर्फे काम सुरू असल्याने लाईट बंद होती मात्र दुपारपर्यंत बँकेतील यूपीएस द्वारे काम सुरू असताना यूपीएस बंद पडले मात्र वीज व्यवस्था सुरळीत झाल्यावर लेजर बंद पडले व त्यामुळे व्यवहार होऊ शकले नाही. दुसर्‍या दिवशी दिवसभर नेट बंद असल्याने लिंक बंदमुळे व्यवहार ठप्प राहिले मात्र खेड्यापाड्यातून येणार्‍या व म्हातार्‍या ग्राहकांना होणार्‍या त्रासास जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत ओह.

खाजगी नेट कनेक्शन ठेवण्याची मागणी
बीएसएनएल, वीज कंपनी, बँक प्रशासन या त्रिकुटातील त्रृटींमुळे मात्र ग्राहक भरडला जात असताना बँक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वारंवार नेटची समस्या येत असताना कोट्यवधींचे व्यवहार होणारी सेंट्रल बँक साधे खाजगी कंपनीचे नेट कनेक्शन का ठेवू शकत नाही? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. बँकेतील एका कर्मचार्‍याला दोन दिवस चोपडा व दोन दिवस शिरसोली आशा पद्धतीने काम दिले जाते तर दोनच दिवस निंभोरा बँकेत देण्यात आल्याने कृषी कर्ज व कार्याची मोठी अडचण या शाखेत येते. दरम्यान, बँके व्यवस्थापक एस.के.ओझा म्हणाले की, बँकेत व्होडाफोन कनेक्शनसाठी मागणी केली असून वरीष्ठांकडे ती प्रलंबित आहे.सायंकाळी नेट सुरळीत झाले असून व्यवहार नियमित होतील.


कॉपी करू नका.