कोरोनाला हरवल्यानंतरही भुसावळात 45 वर्षीय इसमाची आत्महत्या
भुसावळ : कोरोनाला दोन वेळा हरवल्यानंतर 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जामनेर रोडवरील केशर नगरात रविवारी सकाळी पाच ते साडेपाच दरम्यान घडली. चंदन बनारसदास खत्री (45, जामनेर रोडवर, केशर नगर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येने परीसरात पसरली हळहळ !
खत्री यांना दोन वेळा कोरोना झाल्यानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली मात्र रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी संतोष बनारसदास खत्री यांनी दिलेल्या माहितीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खत्री यांनी नेमकी आत्महत्या का व कोणत्या कारणासाठी केली याचा तपास बाजारपेठ पोलिसांकडून केला जात आहे. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.



