1015 रुग्णांची कोरोनावर मात : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा 1048 बाधीत आढळले
21 रुग्णांचा 24 तासात मृत्यू : आतापर्यंत 2099 रुग्णांचा एकूण मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 1048 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 21 रुणांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 1015 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2099 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 1015 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 17 हजार 9162 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख चार हजार 906 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



