गावात फवारणी करून वाढदिवस केला साजरा


सौखेडासीम पोलिस पाटील पंकज बडगुजर यांचा उपक्रम

चुंचाळे : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना वाढदिवस साजरा न करता ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी गावात फवारणी करून सौखेडासीम पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक हात आहे. पंचायत समिती सदस्य शेखर पाटील व मित्र परीवाराचे याकामी सहकार्य लाभले.

पोलिस पाटलांच्या उपक्रमाचे कौतुक
सध्या सर्वत्र कोरोनामुळे जनता भयभीत झाली आहे. सार्‍या देशात थैमान माजवणारा कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच आहे. त्यासाठी शासन आपल्या विविध विभागामार्फत कोरोना रोखण्यात सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. उद्योजक व मोठे व्यावसायिक व प्रतिष्ठित व्यक्ती कोरोना रोखण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करीत आहेत. आपलाही देश कार्यासाठी छोटासा हातभार लागावा या भावनेतून सावखेडासिम येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील पंकज जीवराम बडगुजर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावात कोरोना जिवाणू प्रतिबंधासाठ फवारणी करीत वाढदिवस साजरा केला. यासाठी फवारणी यंत्र पं.स.सदस्य शेखर पाटील यांनी निशुल्क उपलब्ध करुण देत दिले.




यांची होती उपस्थिती
याप्रंसगी अजय पाटील, गणेश पाटील, राहुल बडगुजर, फारुख तडवी, सलिम तडवी, विनायक पाटील, देविदास पाटील, चंदू जावळे, अभिजीत साळवे, छोटु पाटील, पराग पाटील, लक्ष्मण बडगुजर, उस्मान तडवी, श्रीराम मदीर ग्रुप, शेखर पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !