साकळीत 30 वर्षीय महिलेचा विनयभंग


यावल : तालुक्यातील साकळी येथे 30 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी मनोज बिर्‍हाडेविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील एका भागात राहणार्‍या 30 वर्षीय महिलेचा सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास गावातीलच रहिवासी असलेला मनोज श्रावण बिर्‍हाडे याने विनयभंग केला. याचा महिलेच्या पतीने जाब विचारला असता आरोपी त्यासही धक्काबुक्की करीत त्यास धमकावले. तपास यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !