कोरोना : 23 जणांचे मृत्यू : मंगळवारी पुन्हा 1012 बाधीत आढळले
आतापर्यंत 2122 रुग्णांचा एकूण मृत्यू : एकाच दिवसात 995 रुग्णांची मात
जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 1012 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 23 रुणांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 995 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2122 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात 23 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 23 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 995 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 18 हजार 928 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख पाच हजार 901 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 163
जळगाव ग्रामीण 56
भुसावळ 49
अमळनेर 46
चोपडा 53
पाचोरा 59
भडगाव 33
धरणगाव 27
यावल 26
एरंडोल 100
जामनेर 59
रावेर 96
पारोळा 37
चाळीसगाव 64
मुक्ताईनगर 17
बोदवड 120
अन्य जिल्हा 07
24 तासात 23 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात तब्बल 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये-
जळगाव शहरातील 87 वर्षीय पुरूषाचा 37, 50, 52, 60 वर्षीय महिलेचा
रावेर तालुक्यातील 43, 65 वर्षीय पुरूष 45 व 53 वर्षीय महिला
चोपडा तालुक्यातील 65 वर्षीय पुरूष 42 व 45 वर्षीय महिला
मुक्ताईनगर तालुक्यातील 32 व 65 वर्षीय पुरूष व 50 वर्षीय महिला
भुसावळ तालुक्यातील 40 व 53 वर्षीय पुरूष व 66 वर्षीय महिला
जळगाव तालुक्यातील 82 वर्षीय पुरूष 68 वर्षीय महिला
बोदवड तालुक्यातील 56 व 70 वर्षीय पुरूष
जामनेर तालुक्यातील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

