मुक्ताईनगरात सत्ताधारी नगरसेवकांची पालिकेच्या सभेकडे पाठ


गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्याची नामुष्की : सत्ताधार्‍यांमधून केवळ सहा नगरसेवकांची उपस्थिती

मुक्ताईनगर- मुक्ताईनगरात सत्ताधारी नगरसेवकांची पालिकेच्या सभेकडे पाठजुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात झालेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सभा केवळ सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्यामुळे गणपूर्तीअभावी न झाल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे तर काही नगरसेवकांनी ‘महाजनकी’ सुरू असल्याची चर्चा संपूर्ण शहरभर असल्यानेच गणपूर्ती होत नसल्याचे बोलले जात आहे.

केवळ सात नगरसेवकांची उपस्थिती
मंगळवारी मुक्ताईनगर नगरपंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, बांधकाम यासह जवळपास 17 विषय सभेच्या अजेंड्यावर बैठकीला मात्र मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष नजमा तडवी, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, पाणीपुरवठा सभापती निलेश शिरसाठ, स्वीकृत सदस्य ललित महाजन, नगरसेवक मस्तान कुरेशी, नगरसेविका कुंदा पाटील, साधना ससाने हे सत्ताधारी पक्षाचे सहा सदस्य तर विरोधी शिवसेना गटाचे गटनेते राजेंद्र हिवराळे असे केवळ सात सदस्य सभेला उपस्थित राहिले. मुख्याधिकारी सौरभ जोशीदेखील सभेला उपस्थित होते. सत्ताधारी नगरसेवकांपैकी स्वीकृत एका नगरसेवकासह तब्बल दहा भाजपाचे नगरसेवक गैरहजर असल्याने गणपूर्ती होऊ न शकल्याने सभा तहकूब करण्याची नामुष्की नगरपंचायत प्रशासनावर आले. सेनेच्या दोन नगरसेवकांची देखील अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.


कॉपी करू नका.