अंतुर्लीत लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरू होणार
आमदार चंद्रकांत पाटील यांनी 50 बेड केले उपलबध : ऑक्सिजन काँसेंट्रेटर देण्याची घोषणा
मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली येथे कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर सुरू व्हावे याबाबतचे निवेदन शिवसेना अंतुर्लीतर्फे देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयसोलेशन सेंटरसाठी शाळेची पाहणी केली व 50 बेडच्या व्यवस्थेसह वाढीव आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, 10 ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन्स देण्याचे घोषित केले. यामुळे सर्वात मोठी अडचण बेड, आरोग्य कर्मचारी यांची उणीव दूर झाली आहे. आता लवकरच अंतुर्ली येथे कुसुमताई इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सर्व कोरोना रुग्णांसाठी सुसज्ज आयसोलेशन सेंटर सुरू होणार आहे. यामुळे अंतुर्ली व पररसरातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचा भार होणार कमी
याचा फायदा मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय व आयसोलेशन सेंटरचा खूप मोठा भार कमी होणार आहे. याआधी तहसीलदार श्वेता संचेती यांनी पाहणी केली होती व परीस्थितीनुरूप येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची सहमती दर्शविली होती. आमदारांच्या प्रयत्नांमुळे अंतुर्लीला आयसोलेशन सेंटर तयार होणार आह. तालुक्यातील इतर ठिकाणी सुद्धा चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे. यासाठी अंतुर्ली व परीसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विनोद तराळ, सरपंच सुलभा शिरतुरे, डी.आर.महाजन, शरद महाजन, दिनेश पाटील, भाऊराव महाजन, ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, कुलदीप महाजन, निलेश लांडे, बबलू मेढे, माजी शिवसेना शहर प्रमुख सुधीर कुलकर्णी, बाबू हुसेन, विलास काळे, मेढे, डॉ.रमेश कोळी, डॉ.प्रवीण देशमुख, विक्रांत सावकारे, संदीप महाजन, स्वीय सहायक प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

