कुर्‍हा कोविड सेंटरसाठी जिल्हा बँक अध्यक्षांनी दिले 30 बेड


मुक्ताईनगर : सध्या कोरोना प्रचंड वेगाने वाढत असुन मुक्ताईनगर तालुक्यात सुद्धा दररोज रुग्ण संख्या वाढतच आहे. मुक्ताईनगर येथील कोविड सेंटरमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातील लोक सुद्धा उपचारासाठी भरती होत असल्यामुळे मुक्ताईनगर येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. सध्या वाढती रुग्णसंख्या बघता मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर अपुरे पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन कुर्‍हाकाकोडा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले होते कोविड सेंटरसाठी लागणारे साहित्य लोकसहभागातून उपलब्ध करून. देण्याची तयारी सुध्दा दर्शवली होती तद्नंतर तहसीलदार यांनी आदिवासी आश्रमशाळा कुर्‍हा येथे पाहणी करून तेथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी मान्यता दिली असुन लवकरच कोविड सेंटर सुरू होत आहे. त्यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अ‍ॅड.अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी स्व खर्चातून 30 बेड उपलब्ध करून दिले आहेत. अजून आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !