यावलमध्ये बालाजी यात्रोत्सव रद्द
यावल : हनुमान जन्मोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे निघणारा बालाजी महाराज रथोत्सव आणि यात्रात्सव यंदादेखील सलग दुसर्या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला. वर्षभर रथ ज्या जागेवर असतो त्या जागेवरून यंदा पाच पावले पुढे ओढून त्याची प्रतिवार्षिक पद्धतीने रंगरंगोटी करण्यात आली. श्री. बालाजी महाराज ह्यांचा मूर्तीचे पूजन आणि रथाचे पूजन श्री रेणुका देवी मंदिरा जवळील रथाचा जागेवर जाऊन रथ उत्सव अध्यक्ष चंद्रकांत दादा देशमुख ह्यांनी सहपत्नीक केले. पूजेसाठी प्रमुख उपस्थिती आणि पूजेचे यजमान म्हणून माजी नगराध्यक्ष आणि बालाजी महाराज रथोत्सवाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा देशमुख आणि सुनंदा देशमुख यांनी पूजा केली. पुरोहित म्हणून रमेश शास्त्री बयाणी, महेश शास्त्री बयाणी, मोरेश्वर शास्त्री बयाणी, इंद्रजीत शास्त्री जोशी, राजू शास्त्री बयाणी, अथर्व बयानी ह्यांनी पूजा अर्चा केली. जगातील कोरोनाचा नायनाट व्हावा, अशी प्रार्थना चंद्रकांत देशमुख यांनी केली.




